विज्ञान आश्रमातील समुचित तंत्रज्ञान
ग्रामीण विकासासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग आवश्यक आहे, अशी कलबाग सरांची श्रद्धा होती. आपल्या कामाचा वेग, उत्पादकता व कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञान आपल्याला मदत करू शकते. म्हणून विज्ञान आश्रमात तंत्रज्ञानावर भर आहे. कुठले तंत्रज्ञान कुठल्या भागात आणि कशासाठी सोयीचे आहे, हे पडताळून बघावे लागते. ते तंत्रज्ञान कोणत्या परिस्थितीत स्वीकारले जाईल ते तपासून बघावे लागते. हे तपासून बघण्याचे काम …